राहुलकुमार अवचट
यवत -शक्तीचे प्रतीक असणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त यवत (ता. दौंड) येथे घटस्थापना सोमवारी (ता.२६) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर, कळकाई मंदिर, तुकाई मंदिर , काळुबाई मंदिर यासह श्री महालक्ष्मी माता मंदिरात विधीवत घटस्थापना व महापूजा संपन्न झाली.
यवत येथील श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येथे येतात. तुकाई मंदिर व महालक्ष्मी मंदीर दोन्ही मंदिरांमध्ये सकाळी महापूजा, ध्वजपूजन करून विधीवत घटस्थापना करण्यात आली. दोन्ही मंदिरांमध्ये पहिल्या माळीच्या निमित्ताने देवी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
महालक्ष्मी मंदिरातुन आजुबाजुच्या गावातील अनेक मंडळांनी ‘आई राजा उदो..उदो..’चा जयघोष करत जोत घेऊन जात होते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव मंडळ व सुरेशाभाऊ शेळके मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला ,रांगोळी स्पर्धा तर महिलांसाठी संगीत खुर्ची, कलश स्पर्धांचा समावेश आहे.या बरोबरच भव्य तोरण मिरवणूक , चैत्रालीचा नाद करायचा नाय, जादुगार शिवम या कार्यक्रमांचा समावेश आहे