उरुळी कांचन : नवरात्र महोत्सवाचा पार्श्वभूमीवर सोरतापवाडी (ता. हवेली) येथे धार्मिक, सांकृतिक सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल सोरतापवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केला आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे नवरात्रोत्सव साजरा करता आला नाही, परंतु या वर्षी शासनाने निर्बंध शिथिल केले असल्याने, नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२७) होणार आहे.
सोरतापवाडी येथील नवरात्र महोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातून अनेक भक्तगण येतात. २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. लहान मुलांना हा उत्सव म्हणजे पर्वणीच असून, भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
दरम्यान, नवरात्रोत्सवाचे आयोजन महोत्सवाचे आयोजन सरपंच संध्या अमित चौधरी, उपसरपंच शंकर कड, ग्रामपंचायत सदस्य सनी काळभोर, अशोक चौधरी, सुहास चोरघे, रणजीत चौधरी यांनी केले आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित केलेले विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे
१) देवीची भव्य-दिव्य मिरवणूक व प्राणप्रतिष्ठा सोमवारी (ता.२६) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे.
२) सोरतापवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव फेस्टिवल २०२२ चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२७) संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. त्यानंतर खेळ रंगला पैठणीचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम रात्री आठ वाजता होणार आहे.
३) चंदन कांबळे आणि अभिषेक कांबळे यांचा देवींच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम बुधवारी (ता.२८) रात्री आठ वाजता होणार आहे.
४) जय मल्हार हा महाराष्ट्राची लोकधाराचा कार्यक्रम गुरुवारी ( ता.२९) रात्री आठ वाजता होणार आहे.
५) शिवशंभू व्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचे व्याख्यान शुक्रवारी (ता.३०) रात्री आठ वाजता होणार आहे.
६) बारा गावच्या बारा अप्सरा हा बहारदार लावण्यांचा कार्याकरण शनिवारी (ता.१) रात्री आठ वाजता होणार आहे.
७) डान्स व मिमिक्री स्पर्धाचा कार्यक्रम रविवारी (ता.२) रात्री आठ वाजता होणार आहे.
८) हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांचे सुप्रसिद्ध कीर्तन सोमवारी (ता.३ रात्री आठ वाजता होणार आहे.
९) मदमस्त अप्सरा हा सुप्रसिद्ध लावण्यांचा कार्यक्रम मंगळवारी (ता.४) रात्री आठ वाजता होणार आहे.
१०) दसरा ( शिलांगण) या सणाचा कार्यक्रम बुधवारी (ता.५) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दसऱ्यानंतर सोरतापवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव फेस्टिवल २०२२ ची सांगता होणार आहे.