लहू चव्हाण
पाचगणी : पांचगणी शहरात गोकुळाष्टमी व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पांचगणी पोलीस दलाच्यावतीने आज शहरातून संचलन करण्यात आले.पोलिसांच्या ताफ्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. पोलिसांनी शहरात सायंकाळी भर पावसात संचलनाला सुरुवात केली. आगामी गणेशोत्सव आणि गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर हे संचलन असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले.
हे संचालन पोलीस ठाण्यापासून शिवाजी चौक , बिल्लीमोरीया रोडवरून टेबल लॅन्ड नाका, गॅरेज लाइन ते आर्क रोड, बस स्थानक, बाजारपेठेतून पुढे पोस्ट ऑफिसपासून पोलिस स्टेशनपर्यंतच्या मार्गाने पार पडले.यामध्ये पांचगणी पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी आणि २० पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते. या संचलनातून आगामी उत्सव शांततेत पार पाडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
यावेळी पांचगणी सपोनि सतीश पवार, अरविंद माने यासंह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सव दहीहंडी पार्श्वभूमीवर उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला.