दिल्ली : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर, वर्ल्ड चेस्ट चॅम्पियन डी गुकेश, हॉकीचा स्टार खेळाडू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलिट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर, वर्ल्ड चेस्ट चॅम्पियन डी गुकेश, हॉकीचा स्टार खेळाडू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलिट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. यामध्ये एकाही क्रिकेटपटूचा खेलरत्न आणि ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. एवढंच नाही तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. ऑलिम्पिकमध्येही पराक्रम करूनही मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने मनूच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. तर मनू देखील निराश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अशातच आता मनू भाकरला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मोठी कामगिरी केली होती. तर प्रवीण कुमार हा उत्तर प्रदेशचा आहे. प्रवीणने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकलं होतं. डी गुकेश नुकताच चर्चेत होता. सिंगापूरमधील जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून डी गुकेश विश्वविजेता बनला होता.