(Old Pension Scheme ) पुणे : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी (Old Pension Scheme) राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व उपचारासाठी आलेल्या रुग्णांना बसत आहे. ससून आणि काही मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांची आणि नातेवाईकांची गर्दी बघायला मिळायला मिळत आहे. अनेक रुग्ण डॉक्टरांची वाट बघत असल्याचं चित्र आहे. मात्र डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांचे टेन्शन वाढले
पुण्यातील ससून व काही मोठ्या रुग्णालयात रोज शेकडो नागरिक उपचारासाठी येत असतात. रुग्णांची कायम गर्दी बघायला मिळते. या ठिकाणी विविध शस्त्रक्रियाही पार पडत असतात. मात्र शासकीय रुग्णालयातील नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारीही संपात सहभागी असल्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणी आणि शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे. शिवाय डॉक्टर नसल्याने काही अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचं टेन्शन वाढत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात रुग्णालय आहे. गावात पर्यायी रुग्णालय नसल्याने अनेक लोक या रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र या रुग्णालयातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण पुण्यात दाखल होत आहेत. पुण्यातही उपचारासाठी डॉक्टर मिळत नसल्याने नागरिकांना रुग्णांना रस्त्यावर घेऊन उभं राहावं लागत आहे. त्यामुळे संप करा मात्र रुग्णांचा जीव जाईपर्यंत अंत पाहू नका, अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहे.
दरम्यान, सरकारने यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांनी संप संपवून रुग्णांवर उपचारासाठी परत यावं, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. रुग्णालय मोठं आहे. अनेक रुग्ण आहेत. मात्र त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स कमी पडत आहेत. त्यामुळे मुख्य डॉक्टरांनी रुग्णांचे हाल पाहून तरी परत यावे, अशाही भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News ; सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय, आता या; सोनूचीच ,सोशल मीडियावर हवा
Pune Crime पुणे : विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार; प्रेयसीला अॅसिड टाकून मारण्याची धमकी!