पुणे : पुण्यासह पिंपरी -चिंचवड आणि बारामती शहरात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅब चालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे 2025 पासून हे सर्व चालक सरकारने मंजूर केलेल्या अधिकृत भाड्याने नियमानुसार प्रवाशाकडून भाडे वसूल करणार आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे पिंपरी चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅबच्या भाडे दरात एक मे पासून वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी कॅब चालकाच्या बैठकीत सरकारने मंजूर केलेले कॅब भाडे पहिल्या १.५ किमीसाठी ३७ रुपये आणि त्यानंतर प्रति किमी २५ रुपये आहे, अशी माहिती सांगितली.
बातमी अपडेट होत आहे.