नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी OLA इलेक्ट्रिकला ग्राहकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. त्यानुसार, अनेक स्कूटरही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. असे असताना आता कंपनीकडून कर्मचारी कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीतील 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.
Ola Electric कंपनी आता पुनर्रचना मोहीम राबवत आहे. या पुनर्रचनेचाच हा भाग म्हणून ही पावले उचलली जाणार आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले. भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनी ओला इलेक्ट्रिक, ज्याने अलीकडेच आपला IPO लाँच करून शेअर बाजारात एंट्री केली. पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे.
एका अहवालानुसार, या मोहिमेचा परिणाम कर्मचारी कपातीवर दिसून येऊ शकतो. कंपनी तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 12 टक्क्यांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकू शकते. अहवालात असे म्हटले आहे की, सध्या कंपनीमध्ये सुमारे 4000 कर्मचारी काम करत आहेत. यातील काही म्हणजे 12 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. 12 टक्क्यानुसार, 500 हून अधिक कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार असणार आहे.