बापू मुळीक / सासवड : लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीखंडाच्या काळभैरवाचे अवतार असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी, श्री क्षेत्र वीर मंदिराला रविवारी (दि. १५) समस्त कैकाडी समाज बांधवाच्या देणगीतून दर्शनी भागात चांदीची चौकट, महिरप अर्पण करण्यात आला.
तसेच श्रीनाथ म्हकोबा देवस्थान ट्रस्ट मार्फत समस्त भाविकांच्या देणगीतून राजिकदेवी मंदिराच्या चांदीच्या मुखवटा, पादुका यांचा विधिवत अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात समस्त सालकरी, मानकरी, दागीनदार, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (देवाची आळंदी) चे विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज मार्गदर्शनाखाली विधिवत अर्पण सोहळा, “भैरवचंडी याग” आयोजन करून विधिवत संपन्न झाल्याचे व्हा.चेअरमन अमोल धुमाळ यांनी सांगितले.
आज श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टमार्फत श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी यांना पोशाख व सुवर्ण अलंकार साज करण्यात आला. सकाळी ११ वाजता पूजन व अर्पण झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मंदिरात गर्दी झाली होती. श्रीनाथ ,म्हस्कोबा देवस्थान वीर यांचेमार्फत समस्त देणगीदार कैकाडी समाज याच्या देणगीदारांचा यथोचित सन्मान करण्यात आल्याचे चेअरमन राजेंद्रबापू धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या सर्व नवनिर्वाचित सचिव काशिनाथ धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, विराज धुमाळ, सुनील धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, जयवंत सोनवणे, प्रमिला देशमुख, अलका जाधव यांनी सर्व व्यवस्था पहिली.