पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA)आज (दि.01 जुलै) रोजी NEET UG 2024 च्या पुर्नपरीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. https://exams.nta.ac.in/NEET/ या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. NEET UG परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले होते. त्यामुळेच नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे सांगण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर NTA ने 23 जून रोजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेतली होती.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर पुर्नपरीक्षा घेण्यात आली होती. 1563 विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली होती. ग्रेस मार्क्स देण्यावरून झालेल्या वादानंतर या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर निकालाला आव्हान देत कोर्टात प्रकरण पोहचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस मार्क्स सोडून मार्क्स स्वीकारा अन्यथा पुन्हा परीक्षा द्या असे पर्याय देण्यात आले होते. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांमधून 813 जणांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा 23 जून दिवशी घेण्यात आली होती.
NEET UP या परीक्षेचा निकाल NTA ने 30 जून रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. नीट परीक्षेच्या निकालानंतर 6 जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. 8 जुलै रोजी याबाबत सर्वोच्चच न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले आहेत याची आकडेवारी लवकरच समोर येईल. या परीक्षेची मेरीट लिस्ट एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाली आहे.
NEET UG 2024 Re-Exam निकाल कसा पहाल?
– exams.nta.ac.in/NEET या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– ‘NEET UG re-exam results 2024’ वर क्लिक करा.
– त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाका.
– नव्या विंडो मध्ये स्कोअरकार्ड दिसेल.
– आता निकाल पाहण्यासोबतच तो डाऊनलोड देखील करता येणार आहे.