पुणे : डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण आता विद्यार्थ्यांना १० वीचे शिक्षण पूर्ण झाले की, लगेच डॉक्टर होता येणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचा मार्ग सुकर झाला असून, १० वी नंतर विद्यार्थी बीएएमएस डॉक्टर बनू शकतात. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एमबीबीएसची जागा मिळाली नाही, तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडे जाणाऱ्यांची संख्या कर्नाटक सारख्या राज्यामध्ये वाढत चालली आहे.
भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. यावावत गतवर्षी नियम तयार करून त्याबाबत आक्षेप मागवले होते. त्यावर दाखल केलेल्या आक्षेप, सल्ला, सूचनांचा विचार करुन नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘प्री-आयुर्वेद प्रोग्रॅम फॉर आयुर्वेद मेडिसीन अँड सर्जरी रेग्युलेशन्स २०२४’ असे या नियमावलीचे नामकरण करण्यात आले आहे.
दहावी उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एमवीवीएसची जागा मिळाली नाही, तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडे जाणाऱ्यांची संख्या कर्नाटक सारख्या राज्यामध्ये वाढत चालली आहे. साडेसात वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही पदवी मिळेल. पहिली दोन वर्षे प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) असेल.