वानवडी (पुणे): वानवडी येथील एका कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. २४ एप्रिल रोजी़ पोलीस अंमलदार यतीन भोसले व गोपाळ मदने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार ओंकार बधे हा मोठ्या कॅनॉलच्या लगतच्या रोडवर दुचाकीवर थांबलेला आहे. वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक घटनास्थळी पोहोचले असता एक तरुण संशयास्पदरित्या कॅनॉल रोडवर एकटा थांबलेला दिसून आला पोलिसांनी चौकशी केली असता. तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी आरोपीकडून गावठी पिस्टल व २ काडतुसे जप्त करून तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख १ हजार ८०० रुपयांचे एक गावठी पिस्टल, २ काडतुसे दुचाकी व रोख रक्कम मिळून आली. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.