पुणे : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. येत्या दोन दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींना याबद्दलची माहिती दिली.
राज्याची विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. ही योजना निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनली. या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना आर्थिक लाभ दिला. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा हफ्ता आधीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हफ्ताही 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबतचे संभम्र दुर करणारे पत्र जारी केलं आहे.
यावेळी बोलताना माजी मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘ लाडक्या बहिणींना दोन ते तीन दिवसांत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. यासंदर्भात माझे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही योजना कुठेही बंद पडणार नाही. या विरोधात कॉंग्रेसपक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्याच्या विरोधात पोलीसात तक्रार करा. पात्रता आणि निकषांत बदल होणार नाहीत. या योजनेबद्दलच्या फक्त अफवा पसरवत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.