पुणे प्राईम न्यूज : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जसे लोक पार्टीसाठी सज्ज होतात, त्याचप्रमाणे 31 डिसेंबरच्या रात्रीची पार्टी देखील खूप महत्त्वाची आहे. पार्टीचे नियोजन करणे सोपे आहे परंतु त्यादिवशी कोणता लूक करायचा हा प्रश्न पडतो. चला तर मग न्यू ईयरच्या पार्टीसाठी हे पर्याय तुम्हाला खूप उपयोगी पडतील.
-जर तुम्ही पार्टीला जात असाल तर हा नेटेड ड्रेस तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. याच्या मदतीने तुम्ही डार्क आय मेकअप करुन तुमचा लूक सुंदर बनवू शकता.
-जर तुम्हाला बॉडीकॉनचा ड्रेस खूप आवडत असेल तर तुम्ही ब्लॅक, लाल आणि पांढ-या रंगाचा ड्रेस कॅरी करु शकता.
-लाल सिक्विन वर्क ड्रेस या प्रकारच्या शॉर्ट रेड ड्रेसमुळे तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल. यासोबतच लाल रंगांचा ब्लेझर घातलात तर तुमचा लूक अधिक चांगला होईल. यासोबत तुम्ही बॉस लेडी लूकमध्ये दिसणार आहात.
-खूप शॉर्ट गाऊन घालायचा नसेल तर असा लॉंग गाऊन घालून तुम्ही स्टायलिश लूक करु शकता