नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गॅजेट्स आणले जात आहेत. त्यानंतर आता प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘हॉनर’ आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून Honor X1B हा नवा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे.
Honor X1B या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-बाऊंसिंग डिस्प्ले ‘एअरबॅग’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हा भारतातील पहिला फोन असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि लाँग बॅटरी लाईफसह मिळणार आहे. यात अल्ट्रा बाउन्स 360 अँटी-ड्रॉप रेझिस्टन्स असेल, जे अत्याधुनिक कुशनिंग तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. हा अल्ट्रा बाउन्स अँटी ड्रॉप डिस्प्ले शॉकप्रूफ असणार आहे.
यामध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रिझोल्यूशनसह मोठा 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे. डोळ्यांच्या संरक्षणासाठी डायनॅमिक डिमिंग आणि रात्रीच्या वेळी वापरताना निळा लाईट फिल्टर करण्यासाठी सर्केडियन नाईट डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लॉन्च केला जाणार आहे.
तसेच यात 8GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट असेल. प्रायमरी कॅमेरा हा 108 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स असण्याची शक्यता आहे. तर सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.