(New Virus ) पुणे : कोरोना सारख्या जीवघेण्या आजारातून आता कुठे आपण बाहेर पडत असतानाच आणखी व्हायरस नवा (New Virus )धोक्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नव्या व्हायरसमुळे मोठे डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्हायरसमुळे देशभरात या फ्लूचे रुग्ण झपाट्यानं वाढतायत. कर्नाटक आणि हरयाणा या राज्यांमध्ये H3N2 या व्हायरसने दोन बळी देखील घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुन्हा तोंडाला मास्क लावावा लागणार..!
तसेच शेकडो रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. वाढत्या व्हायरच्या प्रभावामुळे गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावावा, असे सांगण्यात आले आहे. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा साधा त्रास जीवघेणा ठरू शकतो.
गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या म्हणण्यानुसार, गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. इंडियन मेडिकल एसोसिएशन (IMA) ने माहिती दिली आहे, या माहितीनुसार, हंगामी तापाची साथ दिसून येतेय. हा ताप दोन-तीन दिवसांत जातो, पण सर्दी-खोकला तीन आठवडे राहतो. प्रदूषणामुळे 15 वर्षांखालील आणि 50 वर्षांवरील लोकांमध्ये श्वसनासंबंधीच्या संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
H3N2 ची लक्षणं काय आहेत
सर्दीमुळे नाक वाहणं
ताप
खोकला
चेस्ट कंजेशन
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, हंगामी इन्फ्लूएंझाची लागण झाल्यावर, ताप, खोकला, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणं आणि नाक वाहणं यासारखी लक्षणं दिसून येतात.
H3N2 चा धोका कोणाला?
इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, 5 वर्षाखालील बालकं, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे.
H3N2 कितपत धोकादायक?
बहुतेक लोक कोणत्याही उपचरांशिवाय इन्फ्लूएंझापासून बरे होताना दिसतायत. मात्र काही प्रकरणं गंभीर असू शकतात. इतकंच नव्हे तर यामध्ये रूग्णाचा जीव देखील जाऊन शकतो. डब्ल्यूएचओच्या मतानुसार, हाय रिस्क असलेल्या रूग्णांची रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची प्रकरणे अधिक सामान्य आहेत.
तो कोरोनासारखाच वेगानं पसरतो
एडेनोव्हायरस एक डीएनए विषाणू आहे, ६० पेक्षा जास्त उपप्रकारांसह, गंभीर आजारांना सेरोटाईप ७, १४, सेरोटाईप १५,२१,१४ शी संबंधित आहे. प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गावर आणि डोळ्यांवर याचा परिणाम होतो. इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये हे न्यूमोनियाचे कारणही ठरू शकते. विशेष म्हणजे तो कोरोनासारखाच वेगानं पसरतो. पूर्वी असं वाटलं होतं की हा विषाणू प्रामुख्यानं दोन वर्षांपेक्षा कमी काळासाठी प्रभावित करतो, परंतु या वर्षी त्याचं रुप निराळं होतं, सिडोफोव्हिरचा उपयोग इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये प्रोगरेसिव्ह आजारांत केला जाऊ शकतो. अशी माहिती गंगाराम रुग्मालयाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. धीरेन गुप्ता यांनी दिली प्रसार माध्यमांना दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Chaturthi Vishesh ;दगडूशेठ; गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास!