New Delhi : : नवी दिल्ली : मोबाईल वापरत असाल या बाबत आपल्याला माहिती हवीच. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पाॅन्स टीमने एक धोकादायक स्पायवेअर शोधून काढला आहे. तो तुमच्या फोनमधील केवळ माहितीच चोरत नाही, तर फोनच्या कॅमेराचा वापर करून गुपचूप रेकाॅर्डिंगदेखील करतो. देशातील ४२ काोटी ॲॅण्ड्राॅइड फोनमध्ये हा स्पायवेअर शिरला आहे. ‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टोमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून तो पसरला आहे.
केंद्र सरकारने धोकादायक स्पायवेअरबाबत अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
स्पिन ओके स्पायवेअर
आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन दिसतो. त्यात सर्वाधिक प्रमाण ॲॅण्ड्राॅइडवर चालणाऱ्या स्मार्टफोनचे आहे. या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोरवरून आवश्यक ॲप्स लोक गरजेनुसार डाउनलोड करतात. मात्र, मागचा-पुढचा विचार न करता अनेकजण धोकादायक ॲप्स डाउनलोड करतात. हे किती धोकादायक ठरू शकते, (New Delhi) याची सर्वसामान्य लोक कल्पनादेखील करू शकणार नाहीत. स्पिन ओके स्पायवेअर हा जावा स्क्रिट कोडच्या माध्यमातून हळूहळू क्षमता वाढवितो. अतिशय कमी कालावधीत ताे माेठ्या प्रमाणात पसरला आहे.
असे ओळखा स्पायवेअर
तज्ज्ञांनी या स्पायवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. (New Delhi ) फोनमध्ये अनेकदा जाहिराती अचानक सुरू हाेतात. तसे हाेत असल्यास हमखास स्पायवेअर तुमच्या फाेनमध्ये असू शकताे. गेल्या काही महिन्यात डाउनलाेड केलेले ॲप्स अशा वेळी अनइन्स्टाॅल करणे याेग्य ठरेल, असे तज्ज्ञ म्हणतात.
‘स्पिन ओके’ काय करू शकतो?
– स्पिन ओके हा तुमच्या फोनमधील कॅमेरा वापरून गुपचूप रेकाॅर्डिंग करू शकतो.
– डेटा काॅपी करून अज्ञात रिमोट सर्व्हरवर पाठवतो.
– फोन कुठेही ठेवला असेल तरी आजूबाजूचे आवाज रेकाॅर्ड करत राहतो.
– डिलीट केलेल्या फाइल्सदेखील तो रिकव्हर करू शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi News : दिलासादायक ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय