NEET Paper Leak : मुंबई : देशभरात गाजत असलेल्या ‘NEET’ पेपरफुटी प्रकरणावरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी ‘NEET’ परीक्षा तात्काळ रद्द करावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. NEET Paper Leak

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या भूमिकेत ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारलाही थेट सवाल केला. “महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार नसेल, तर सरकारचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. NEET Paper Leak
“पेपरफुटीने केंद्र सरकारचं अपयश उघड”
‘NEET’परीक्षेतील कथित पेपरफुटीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “१० लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकली गेल्याच्या चर्चा होत आहेत. या रॅकेटची मुळे महाराष्ट्रात सापडली असली तरी हे जाळं देशभर पसरलेलं आहे. यात मोठ्या कोचिंग क्लासेसचाही सहभाग असू शकतो.” त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलं की, “प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची केंद्राची पद्धत झाली आहे. परीक्षा रद्द करून आणि सीबीआय चौकशी लावून सरकार मोकळं होतं, पण २२ लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी राहिलं त्याचं काय?” NEET Paper Leak
“२०१६ पासूनच ‘NEET’ ला विरोध”
राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, २०१६ मध्ये ‘NEET’ लागू झाल्यापासून ते या प्रणालीला विरोध करत आहेत. त्यांच्या मते, या परीक्षेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेसचा फायदा होतो, तर सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. NEET Paper Leak
त्यांनी दक्षिण भारतातील राज्यांचाही उल्लेख करत म्हटलं की, तामिळनाडूसह अनेक राज्यांनी ‘NEET’ विरोधात भूमिका घेतली आहे. “दक्षिणेतील राज्ये आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मेडिकल कॉलेजेस आहेत. उत्तरेकडील विद्यार्थ्यांना दक्षिणेत प्रवेश मिळावा यासाठी ही व्यवस्था राबवली जात आहे,” असा आरोपही त्यांनी केला. NEET Paper Leak
“राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी”
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनाही आवाहन केलं. “जरा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा. राज्याच्या हितासाठी ठाम भूमिका घ्या,” असे ते म्हणाले. त्याचबरोबर, “सध्या सरकार पेट्रोल-डिझेल बचतीच्या इव्हेंटमध्ये व्यस्त आहे. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर बोला,” असा टोला त्यांनी लगावला. NEET Paper Leak







