पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश प्राप्त झाले आहे, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता पराभूत झालेल्या उमेदवारांकडून फेर मोजणी घेण्याची मागणी बळ धरत असताना पुणे जिल्ह्यातील 11 पराभूत उमेदवारांनी मतमोजणी यंत्रांची म्हणजेच ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (हडपसर), अशोक पवार (शिरूर), रमेश बागवे (कॅन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला), यांचा यामध्ये समावेश आहे.
तसेच मतदान यंत्राच्या फेर पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ ठरवली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात पराभूत झालेल्या ११ उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. या उमेदवारांनी ईव्हीएमच्या पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज सुद्धा केले आहेत. या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (हडपसर), अशोक पवार (शिरूर), रमेश बागवे (कॅन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला) यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत जगताप यांनी २७ बूथवरील फेरमतमोजणीसाठी १२ लाख ७४ हजार रुपयांचं चलन भरलं असल्याची माहिती समोर येत आहे.