लहू चव्हाण
पाचगणी : नवरात्रोत्सवात पाचगणी परिसरातील गावोगावी देवी बसवल्या जात नसल्या तरी रास दांडिया व इतर होणाऱ्या कार्यक्रमांची परवानगी घ्यावी. उत्सव दरम्यान शहरात ठीकठीकानी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यांची वॉच राहणार असून यंदाचा नवरात्र उत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केले.
नवरात्र मंडळांचे पदाधिकारी आणि पोलीस पाटलांच्या आयोजित बैठकीत पवार बोलत होते. या बैठकीस आशिष दवे, विशाल गायकवाड, निलेश महाडीक, पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे, अजय राजपुरे, विशाल पवार, राजेंद्र दुधाने, शैलेश भिलारे, रुपाली गोळे, मनीषा पांगारे, रुपाली कांबळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावचे पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले गावात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस पाटलांनी याबाबत सतर्क रहावे.त्याच पद्धतीने डॉल्बी विरहित मिरवणुका असाव्यात आणि दांडिया खेळताना नियम आणि वेळेचे बंधन ठेवावे तर देवींच्या ठिकाणी आपले कार्यकर्ते दिवसभर हजर असावेत. पोलीस नाईक वैभव भिलारे यांनी आभार मानले.