नाशिक : येथे गेल्या तीन दिवसांपासून सराफी व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यात तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले.
नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांची एकाच वेळी कारवाई केली. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. आयकर विभागाने अचानक केलेल्या या छापेमारीमुळे परिसरासह सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले. सलग तीस तास ही तपासणी करण्यात आली. आयकर विभागाच्या अधिका-यांनी बंगल्यातील फर्निचर फोडून नोटा बाहेर काढल्या आहे.
मागील काही दिवसांपासून कर बुडवे व्यवसायिक हे आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यानुसार आयकर विभागाचे अधिकारी खासगी वाहनातून नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली. ज्या ठिकाणी छापेमारी सुरू होती, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.