Narayangaon News : नारायणगाव : गणेशोत्सव विसर्जन आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी येत असल्याने नारायणगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी जुलूस मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
धर्मनिरपेक्षता आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यासाठी ऐतिहासिक निर्णय
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि बांधवांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नारायणगाव जामा मस्जिदचे विश्वस्त एजाज आत्तार, सिद्धिक शेख, हाजी नूर महंमद मणियार, सलीम मोमीन, अखलाक आत्तार, राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख, दादामिया पटेल, पोलीस उपनिरीक्षक सानील धनवे, दत्ता ढेंबरे यांच्यासह वडगाव कांदळी, हिवरे, नारायणगाव, खोडद, निमगाव सावा, पारगाव, आळे, वडगाव कांदळी, (Narayangaon News ) येडगाव, आर्वी, पिंपळगाव गावातील मस्जीद अध्यक्ष, मौलाना, सदस्य या वेळी उपस्थित होते.
नारायणगाव जामा मस्जिदचे विश्वस्त एजाज आत्तार म्हणाले की, पोलीस प्रशासनावर ताण येऊ नये या सामाजिक भावनेतून नारायणगाव आणि परिसरातील मुस्लिम बांधव २८ सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर जयंती मशीदीमध्येच साजरी करतील. (Narayangaon News ) जुलूस आणि इतर धार्मिक कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी होणार आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बांधवांनी हिंदू आणि मुस्लिम ऐक्य अबाधित राहून समाजामध्ये धर्मनिरपेक्षता आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य केले आहे, अशी माहिती महादेव शेलार यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Narayangaon News : नारायणगाव येथील जेसीबी ड्रायव्हरच्या खुनाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश