Namo Farmers Honor Fund :सोलापूर : चालू आर्थिक वर्षासाठी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास आता मान्यता देण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. (Namo Farmers Honor Fund)
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचे घरकूल व्यवस्थित चालावे, उदरनिर्वाह व्हावा, यासाठी केंद्र शासनाने चालवलेली योजना म्हणजेच पीएम किसान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. (Namo Farmers Honor Fund)
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजने”अंतर्गत केंद्र शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषि) यांच्या मार्फत वितरीत कण्यात येईल. यामध्ये पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च प्रति हप्ता दोन हजार रुपयांप्रमाणे लाभ वितरीत करण्यात येईल. (Namo Farmers Honor Fund)
या योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. (Namo Farmers Honor Fund)
दरम्यान, केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. पी. एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील. (Namo Farmers Honor Fund)