पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात अत्याचार,खून,गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच आता पुण्यातून संतप्त घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या लेकीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे माय लेकीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.भारती विकास कुऱ्हाडे असं विकृत आईचं नाव आहे. स्वतःच्या लेकीशी केलेल्या भयानक कृत्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.ही विकृत महिला आपल्या अल्पवयीन मुलीसोबत बिबवेवाडी परिसरात राहते. या महिलेचं गुरुदेव स्वामी नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची बाब मुलीच्या लक्षात आली. यासंबंधी तिने आईचं कृत हे त्यांच्या घरमालकाला सांगितलं. याचाच राग मनाशी धरून भारती कुऱ्हाडेनं आपल्या पोटच्या मुलीचे अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केले. यासाठी तिने बॉयफ्रेंडच्या मदतीनेच स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल केले. इतकेच नाही तर या विकृत महिलेने व्हिडिओ बॉयफ्रेंडला पाठवत अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला लावले.या महिलेनं आणि तिच्या प्रियकराने केलेल्या कृत्यामुळे पोलीस कमाली संतापले.
दरम्यान भारती कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर दोघेही फरार झाले होते. अखेरीस बिबवेवाडी पोलिसांनी शनिवारी या दोघांना अटक केली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहे.