मुंबई: सरत्या वर्षात मुंबईकरांनी महागड्या कारच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. मुंबईत सरत्या वर्षात मुंबईकरांनी महागड्या कारच्या खरेदीचा विक्रम नोंदवला आहे. 10-20 नाही तर तब्बल 1400 महागडी वाहने नोंदवण्यात आली आहेत. फेरारी, लेम्बोर्गिनीपासून ते ऑडीची खरेदी करण्यात आली आहे. मागच्या वर्षभरात मुंबईकरांनी महागडी वाहने खरेदी करण्यास पसंती दिली आहे. मुंबई मायानगरीत महागड्या कारमुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा मिळाला आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या दरम्यान किती गाड्यांची खरेदी?
मुंबईकरांनी गेल्यावर्षी महागड्या कारला पसंती दिली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 या दरम्यान मुंबईत 1353 महागड्या आणि आलिशान कारची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यूने महागड्या गाड्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. कोरोना काळात दोन वर्षे नागरिकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात नागरिकांची आर्थिक गाडी हळूहळू रुळावर आल्यानंतर गेल्या काही दिवसात महागड्या गाड्या आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबईकरांकडून कोणती कार सर्वाधिक पसंत केली जात आहे?
मुंबई करानी गेल्या वर्षभरात महागड्या 1400 गाड्या खरेदी केल्या आहेत. फेरारी, लेम्बोर्गिनी, मिनी कूपर, जागवार, मर्सिडीज, फोर्स, रोल्स, रॉयल्स यासारख्या चार चाकी तर अमेरिका ड्रीम्स, डुकाटी, मॉन्स्टर, स्क्रॅंबलर या दुचाकींच्या प्रेमात श्रीमंत मुंबईकर पडले आहेत वर्षभरात कोट्यावधी किंमतीच्या महागड्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.
प्रतिष्ठा आणि आरामदायी प्रवासासाठी खरेदी..
इलेक्ट्रिक, सीएनजी, पेट्रोल, डिझेल, यासारख्या इंधनावर चालणारी ही वाहानं आहेत. प्रतिष्ठा आणि आरामदायी प्रवासासाठी या वाहनांची खरेदी वाढली आहे. 2024 मधील 19 डिसेंबर रोजीपर्यंत ताडदेव आरटीओमध्ये 665, अंधेरी आरटीओमध्ये 495, वडाळा आरटीओमध्ये 130, बोरिवली आरटीओमध्ये 120 अशा एकूण 1410 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.
परिवहन विभागाला कोट्यावधी रुपयांचा महसूल प्राप्त..
या वाहनांचा दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. या वाहनांवर 20 टक्के नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. गेल्या वर्षी 1410 वाहनांची नोंदणी झाली. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याद्वारे परिवहन विभागाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.