Mumbai News : मुंबई : मुंबई पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे. एसटी महामंडळात शिवाई इलेक्ट्रिक बसेसनंतर आता इंधनावर धावणाऱ्या ‘ई-शिवनेरी’ बसेस आणल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला असून, तब्बल १०० ई-शिवनेरी महाराष्ट्रातील विविध रस्त्यांवर धावणार आहेत.
तिकीट दरही होणार कमी!
राज्यभरात हजारो प्रवासी रोज बसने प्रवास करतात. मात्र, मुंबई-पुणे रस्त्यावर धावणारी एसटी महामंडळाची ‘शिवनेरी’ बस अल्पावधीतच लोकप्रिय झाली. आता मुंबई-पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Mumbai News) आता लवकरच ‘ई-शिवनेरी’ने प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. जन-शिवनेरी या नावाने या बस धावणार असून, प्रवास आरामदायी होणार आहे.
इंधनावरील धावणाऱ्या शिवनेरीच्या तुलनेत ई-बस शिवनेरीचे भाडे स्वस्त असेल. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले की, सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत या नव्या सुरु होणाऱ्या बसचा तिकीट दर कमी असेल. डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा खर्च कमी असल्यामुळे या ई बसचा दरही कमी होणार आहे. (Mumbai News) बसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
नव्याने येणाऱ्या सर्व १०० इलेक्ट्रिक बसेस मुंबई पुणे महामार्गावर सोडण्यात येणार आहेत. या बसेस सुमारे ३५० किलोमीटरपर्यंत धावू शकणारे चार्जिंग क्षमता राहणार आहे. शिवाय, मुंबई पुणे महामार्गावर चार्जिंग स्टेशन सुद्धा बसवण्यात आल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रिक बस ३५० किलोमीटरपर्यंत अंतर सहज कापू शकणार आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत. (Mumbai News) बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४3 प्रवासी बसू शकणार आहेत.
नव्या ई-शिवनेरी बसमध्ये असणाऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना प्रवासात अडचण येणार नाही. प्रवाशांसाठी आरामदायी खुर्च्या, मोबाईल चार्जिंगसाठी जागा, बॅग ठेवण्यासाठी जागा असणार आहेत. त्यामुळे आता शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : बाईकच्या आरशाला धक्का लागला अन् मोठा अनर्थ घडला; तरुणाची हत्या!
Mumbai News : समृद्धी महामार्गावर एअर अॅम्बुलन्स सुरू करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय!