Mumbai News : मुंबई : स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. तुम्ही सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत (सोवेरियन गोल्ड बॉन्ड SGB) स्वस्त सोने खरेदी करू शकता. सोवेरियन गोल्ड बॉन्ड सोमवारपासून ग्राहकांना घेता येणार आहे. ज्यात सोन्यावर ५० टक्के सूट मिळणार आहे. या योजनेत तुम्ही फिजिकल किंवा ऑनलाइन सोने खरेदी करू शकता. तसेच तुम्ही या रोख्यांवर कर्ज देखील घेऊ शकता. याची अंतिम मुदत २७ जून आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बाँडची इश्यू किंमत लवकरच जाहीर केली जाईल.
सोन्यावर ५० टक्के सूट
सोवेरियन गोल्ड बॉन्ड मालिकेत सोन्यावर ५० टक्के सूट मिळणार आहे. या योजनेत तुम्ही फिजिकल किंवा ऑनलाइन सोने खरेदी करू शकता. तसेच तुम्ही या रोख्यांवर कर्ज देखील घेऊ शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) आणि (RBI) याच्या किंमती लवकरच जाहीर करणार आहे.(Mumbai News) किती कालावधीसाठी तुम्ही सोनं घेता यावरही किंमत अवलंबून असेल. सोवेरियन गोल्ड बॉन्ड हा एक प्रकारचा बॉन्ड आहे. ज्यावर तुम्ही पैसे गुंतवले की तुम्हाला व्याज मिळतं. सर्वास सुरक्षित बॉन्ड म्हणून याकडे पाहिलं जातं. तुम्हाला कॅशमध्ये पैसे भरावे लागणार आहेत. जेव्हा तुमची मुदत पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला परत पैसे दिले जातील.
सोवेरियन गोल्ड बॉन्ड शेड्यूल्ड कमर्शियल बँका, स्टॉक होल्डिंग (Mumbai News) कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ,क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज – नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड यांच्याद्वारे विकले जातील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आता रेशनसाठी रांगा लावायची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Mumbai News : ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात दाखल; आज पक्षप्रवेश…!