पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई उच्च न्यायालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात संसाधन कर्मचारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 80 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संसाधन कर्मचारी.
– एकूण रिक्त पदे : 80 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर, औरंगाबाद.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 31,064 /-
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजूला, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400001
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.