मुंबई : मुंबईच्या मढजवळ समुद्रात दोन मासेमारी करणा-या बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात असलेली मढ कोळीवाड्यात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री 12.00 ते 12.30 च्या दरम्यान मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्देवी अपघात झाला. या बोटीला एका मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट उलटली.
बोटीतील सहा खलाशांनी संपूर्ण रात्रभर जागून बोट समुद्रात बुडण्यापासून वाचवली. मालवाहतूक करणा-या जहाजांचे चालक हे नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मासेमारी करणा-या बोटीच्या मालकाने केला आहे. सुदैवाने त्यावेळी आजुबाजूला काही बोटी असल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी लोकांचा जीव वाचला.