पुणे प्राईम न्यूज डेस्क: वेक फिल्म्स, मयसभा करमणूक व मंडळीकृत परेश मोकाशी लिखित, दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी व दिलीप शितोळे निर्मित ‘मु. पो. बोंबीलवाडी’ हा चित्रपट नव्या वर्षात धमाल करत हसवणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच आला असून, १ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नुकत्याच चित्रपटाचे निर्माते- दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटाविषयी संवाद साधत मनमुराद गप्पा मारल्या.
या वेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, सुनील अभ्यंकर, अद्वैत दादरकर, मनमित पेम, अभिनेत्री रितिका श्रोत्री आदी उपस्थित होते. प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या, तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.