नवी दिल्ली : सध्या अनेक असे स्मार्टफोन आहेत त्यामध्ये फिचर्सही हटके पाहिला मिळतात. त्यातच प्रसिद्ध कंपनी मोटोरोलाने आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम फिचर असणार एक स्मार्टफोन लाँच केला. पण आता हाच फोन एक-दोन नाहीतर तब्बल 8 हजारांनी स्वस्त मिळत आहे.
फ्लिपकार्टवर ‘बिग सेव्हिंग डेज’ सेल सुरू आहे आणि सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. त्या मोटोरोला Motorola Edge 40 Neo हा फोन 27,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकणार आहे. Motorola Edge 40 Neo मध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.55-इंचाचा 10-बिट पोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा फोन 144Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि ती 68W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 7030 SoC आहे, जो 6nm फॅब्रिकेशन प्रक्रियेवर तयार केला आहे. मीडियाटेकचा हा चिपसेट असणारा हा फोन जगातील पहिला फोन असल्याचे म्हटले जात आहे. Motorola Edge 40 Neo मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि तो OIS सह 50-मेगापिक्सलचा सेन्सर देतो आणि त्यात 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल स्नॅपर आहे, जो मॅक्रो आणि डेप्थ फोटोग्राफीलाही सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठीही फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.