Mobile Phone : पुणे : मुसळधार पावसात देखील आपल्याला नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जावे लागते. पावसात रेनकोट घालून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. पण आपल्याजवळील स्मार्ट फोन पाण्यात भिजला तर नादुरुस्त होतो. तुमचा स्मार्टफोन पावसाळ्यामध्ये सुरक्षित ठेवणे अत्यंत अवघड काम आहे. त्यासाठी खूप कसरत करावी लागते. पण काळजी करू नका. या सोप्या टीप्स नक्की फॉलो करा. याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्ट फोन पावसाळ्यात सुरक्षित ठेवू शकता.(Mobile Phone)
ओलाव्यापासून स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठीच डिझाईन केले आहे.
– पावसाळ्यात बाहेर पडण्याआधी तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी एक वॉटरप्रूफ कव्हर खरेदी करा. हे कव्हर पाणी आणि ओलाव्यापासून स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठीच डिझाईन केले आहे. पावसात फोन बाहेर न काढताही तुम्ही फोनचा वापर करू शकता.(Mobile Phone)
– तुम्ही पावसामध्ये बाहेर जाणार असाल तर फोन हवा बंद बॅगेत ठेवा. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बॅगेत फोन ठेवल्यानंतर तुमचा फोन कसा वापरता येईल? महत्त्वाचे कॉल आणि मेसेज कसे मिळतील,(Mobile Phone) तर त्यासाठी मार्केटमध्ये पारदर्शक वॉटरप्रुफ मोबाईल पाऊच मिळतात. तुम्ही असे पाऊच खरेदी करू शकता. त्याची किंमतही फार जास्त नसते.
– सध्या असे स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत, जे तुम्ही पाणी, शॉवर, स्विमिंग अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकता. यासाठी, स्मार्टफोनमध्ये IP67/IP68 रेटिंग दिली जाते, ज्यामध्ये पाणी आणि धूळ संरक्षण उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने तुमचा फोन पावसात सुरक्षित राहील.(Mobile Phone)
– बाजारात खूप कमी किमतीत ब्लूटूथ ईयरफोन्स आणि ईयरबड्स उपलब्ध आहेत.
– अचानक पाऊस सुरू झाल्याने कोठेही बाजूला थांबेपर्यंत आपण भिजून जातो. अशा स्थितीत फोनला खराब होण्यापासून वाचण्यासाठी त्वरित वृत्तपत्र अथवा पॉलिथिनने झाका. प्लास्टिकमुळे तुमच्या फोनला पाणी लागणार नाही. त्यानंतर स्वच्छ कापडाने फोन पुसू शकता.
– पावसाळ्यात बाहेर पडताना रेनकोट नेहमी सोबत ठेवावा. यामुळे तुम्ही देखील भिजण्यापासून वाचाल व तुमचा स्मार्टफोन देखील सुरक्षित राहिल. तुम्ही फोनता रेनकोटच्या आतील पॉकेटमध्ये ठेवू शकता.(Mobile Phone)
– पावसात अडकल्यास सर्वात प्रथम स्मार्टफोन स्विच ऑफ करून खिशात ठेवून या. याशिवाय फोनचा स्पीकर, चार्जर पॉइंट आणि हेडफोन जैक सारख्या गोष्टी रुमाल अथवा इतर गोष्टीने झाका.(Mobile Phone)