बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही आग वीजवताना दोन कर्मचारी होरपळले असल्याची माहिती आहे. मात्र, ही आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यातील हा कारखाना आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस दाखल झाले असून आग वीजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.