भंडारा : महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज रविवारी (दि.29 डिसेंबर) पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. सोमवारी दुपारी 2 वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी येते अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मीराबाई पटोले यांचे वय 90 होते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होणार आहेत.