नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स आणले जात आहेत. त्यात आता Meta कडून Ray-Ban Glasses आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात डिस्प्लेसह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. आता हा चष्मा लवकरच लाँच केला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
Ray-Ban Glasses मध्ये अधिक नवीन फीचर्स मिळणार आहेत. ज्यामध्ये डिस्प्लेचा समावेश असू शकतो. यामध्ये नोटिफिकेशन्स, अलर्ट्स आणि नेव्हिगेशन इत्यादी पाहता येतील. यामुळे स्मार्टफोनची गरज भासणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मेटा कंपनी पुढील वर्षी स्मार्ट ग्लासेसची नवी सीरीज लाँच करू शकते. या नवीन सीरीजमध्ये डिस्प्ले दिसेल. डिस्प्ले या नवीन चष्म्यांसह एकत्रित केला जाईल. या डिस्प्लेच्या मदतीने तुम्ही कंपनीच्या नोटिफिकेशन्स आणि मेटा AI शी इंटिग्रेट करण्यात सक्षम व्हाल.
या डिस्प्लेच्या मदतीने युजर्संना नेव्हिगेशनसह फोन किंवा स्मार्टवॉचवरून सूचना देखील दिसतील. याशिवाय इतर अनेक फायदेही पाहायला मिळतील. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन प्रॉडक्टमध्ये अनेक अपग्रेड्स पाहायला मिळतील. रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसमध्ये व्हॉइस असिस्टंट देखील असू शकेल. सध्या रे-बॅन मेटा स्मार्ट चष्म्यासह युजर्सना व्हॉईस असिस्टंटची सुविधा मिळते. त्याच्या मदतीने, युजर्स मेसेज पाठवू, कॉल करू शकतील.