अजित जगताप
सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खटाव तालुक्यातील कोरेगाव वांगी या गावाचा दौरा करणार असून वेताळ बाबाचे दर्शन घेणार आहेत. २८ वर्षापूर्वी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी वांगी कोरेगाव या गावात भेट देऊन शिवसैनिकांशी संपर्क साधला होता. तसेच पूजनीय वेताळ बाबाचे दर्शने घेतले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह खटाव तालुक्यात शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे, अशी माहिती शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.
२८ वर्षांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत डॉक्टर महेश गुरव यांची भेट झाली होती. १९९० साली वडूज नगरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. त्याची ही आठवण जुन्या शिवसैनिकांनी करून दिली आहे. तसेच सर्वांनाच त्यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता लागली असल्याची माहिती शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे व स्थानिक ग्रामस्थांनी दिली.