पुणे : चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सल्लागार, रजिस्ट्रार, हाऊसमन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी दर सोमवारी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 59 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. कन्सल्टंट पदासाठी 1,25,000 तर ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार पदाकरिता 1,00,000 व हाऊसमन पदासाठी 80,000 इतका पगार मिळू शकणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालय, पिंपरी-18 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.