Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 August 2026, 13:11

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर 26 ऑगस्ट रोजी घडलेल्या एका गंभीर दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समृद्धी महामार्ग पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत काल रात्री आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे .

हा धक्कादायक प्रकार दुसंगवाडी शिवारात घडला. हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव येथून एका अतिगंभीर रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी ‘एर्टिगा’ गाडीतून मुंबईकडे नेले जात होते. आमदार संतोष बांगर यांच्या शिफारस पत्राद्वारे ही वैद्यकीय मदत पुरवली जात होती. प्रवासादरम्यान दरोडेखोरांनी रस्त्यावर लोखंडी वस्तू टाकून गाडीचे इंजिन जाणीवपूर्वक खराब केले. इंजिनमधून ऑइल गळती सुरू झाल्यामुळे चालकाला वाहन थांबवावे लागले.

गाडी थांबताच दरोडेखोरांनी वाहनावर हल्ला केला. प्रवाशांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या दरोड्यात चोरट्यांनी चालक किरण खंदारे यांच्या जवळील 7 हजार रुपये रोख, गाडीच्या डिगीतील 34 हजार रुपये, तसेच 2 तोळ्यांची सोन्याची साखळी आणि 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज लुटून नेला.

सुदैवाने संबंधित वाहनात कॅमेरा बसवलेला होता. यामध्ये दरोडेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला जेरबंद केले. चालक किरण खंदारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक केलेल्या किरण गायकवाडसोबत आणखी किती साथीदार होते आणि त्याचा इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp