वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही लक्ष द्यावे. अशा काही गोष्टींची काळजी घेणे विशेषतः महत्वाचे आहे. छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. लग्नानंतर नवरा-बायको 24 तास एकमेकांसोबत राहतात, अशा परिस्थितीत त्यांच्यात काही ना काही भांडण होणे स्वाभाविक आहे.
पती-पत्नीमधील भांडणात एकाने जरी मनावर घेतलं तर भांडण टोकाला जाऊ शकतं. असे वारंवार केल्याने तुमच्यातील संबंध बिघडू शकतात आणि तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून, विवाद आणि मतभेदांना आणखी वाव देऊ नका. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून परस्पर प्रेम जपावे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सहमत नसाल तेव्हा तुमच्यामध्ये असे प्रसंग कधीही उद्भवू शकतात. अशा स्थितीत त्या असहमतीचे स्वागत करून समोरच्या व्यक्तीचे ऐकले पाहिजे.
तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असावा असे कधीही समजू नका. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. तुमच्यामध्ये कोणत्याही मुद्द्यावरून वाद झाला तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांना दोष देऊ नका. एकमेकांच्या वाढीस प्रोत्साहन द्यायला कधीही विसरू नका. अशाने नाते आणखी घट्ट होऊ शकतं.