सागर जगदाळे
Maratha Aarakshan : भिगवण, (पुणे) : मराठा क्रांती मोर्चाने इतिहास घडविला ५८ मोर्चे काढले, परंतु मुळ मागणी अद्याप तशीच प्रलंबित आहे. ५०% च्या आतील व ओ.बी.सी. कोट्यातून आरक्षण मिळायला पाहिजे परंतू सरकार असमर्थ असेल तर केंद्र सरकारने घटनेत बदल करून ५० टक्केच्या बाहेर आरक्षण घ्यावे या मागणीसाठी दिल्लीत मंगळवारी (ता. २५) सकाळी १० ते ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तरी समाज बांधवांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे यांनी केले आहे.(Maratha Aarakshan)
मराठा क्रांती मोर्चाने इतिहास घडविला ५८ मोर्चे काढले,
मराठा समाजासाठी आरक्षण हा विषय १९८१ साली अण्णासाहेब पाटील व अँड. शशिकांत पवार यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून पहिल्यांदा ऐरणीवर आणला तेव्हापासून ते २०१६ मधील क्रांती मोर्चे निघेपर्यंत यासाठी मराठा महासंघाने मोर्चे, उपोषणे रस्ता रोको, परिसंवाद अशी विविध आंदोलने केली.(Maratha Aarakshan)
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम केले. त्यांचा आदर्श पुढे घेऊन चालले पाहिजे.मराठा महासंघाला जाती -पातीच्या राजकारणात पडायचे नसून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले तरच ते टिकाऊ ठरेल पण ते देण्यास सरकार असमर्थ असेल तर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मराठा आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आता दिल्लीत आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा महासंघाने दिली आहे.(Maratha Aarakshan)
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप,राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, युवक प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, राज्य उपाध्यक्ष अजय पाटील, युवक प्रदेश कार्याध्यक्ष परशुराम कासुळे, सरचिटणीस पुणे शहर मयुर गुजर उपस्थित होते.