-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना घाटंजी तालुक्यातील मानोली येथे घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजु रामाजी लेणगुरे (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे.
रुषभ उर्फ मिथुन राजू लेणगुरे (वय 28 रा. मानोली) असे खून झालेल्याचे नाव आहे तर रुपेश पुंडलिक गुरणुले (वय 25 रा. मानोली) आणि पुंडलिक तानबाजी गुरणुले (वय 60 रा. मानोली) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध अपराध क्रमांक 1042/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103, 3 (5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजु लेणगुरे हा मानोली येथे कुटुंबासोबत राहतो व पेंटरचा व्यवसाय करतो. त्याला 2 मुले असुन मोठा मुलगा आशिष लेनगुरे याचे लग्न झाले आहे. तो त्याच्या पत्नी व मुलांसह दुसरीकडे राहतो. फिर्यादी राजु व त्याची पत्नी वंदना लेनगुरे आणि त्यांचा लहान मुलगा रूषभ उर्फ मिथुन लेनगुरे असे एकत्र कुटुंबात राहतात. मुलगा रूषभ हा अविवाहीत असुन गवंडी काम करत होता. रूषभचा गावातील तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून रूषभ व रूपेश लेनगुरे यांच्यात नेहमी वाद होत असे. (दि. 22 ऑक्टोबर) रोजी रुषभ आणि तरुणी हे दोघेही घरुन पळुन गेले होते. अंदाजे 8 दिवसापुर्वी ते दोघेही परत आले तेव्हा तरुणीची आई मंदा दिगांबर कावळे (रा. मानोली) हीने तिला तिच्या घरी घेवुन गेली होती.
दोन तीन दिवसांपुर्वी तिला रूपेश गुरनुले याच्या घरी गेली होती. त्यानंतर (दि. 04 डिसेंबर) रोजी रूषभ व रूपेश गुरनुले यांच्यात अनैतिक संबधाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी रूपेश गुरनुले व त्याचे वडील पुंडलीक गुरनुले यांनी रुषभला धमकी दिली होती की, तु यानंतर आमच्या घराच्या आजु बाजुला दिसला तर, तुला मारुन टाकेल. तेव्हा फिर्यादीने दोघांनाही समजावुन शांत केले होते. त्यावेळी सदर वादाबाबत पोलीस पाटील यांनी सुध्दा रूपेश गुरनुले यांस समजावुन सांगितले होते. (दि. 05 डिसेंबर) रोजी रात्री झोपला होता. त्यानंतर अंदाजे रात्री अकराच्या दरम्यान माझ्या बाजुचा पलंग वाजल्याने मी जागा झालो. माझा मुलगा रूषभ हा पलंगावर झोपूत होता. त्यानंतर मी पुन्हा झोपी गेलो. (दि. 06 डिसेंबर) रोजी पहाटे 06 वाजता मामे बहीण अनुमबाई पेटकुले हीने घरी येवुन सांगितले की, तुमचा मुलगा रूषभ हा रूपेश गुरनुले याच्या घरासमोर पडुन आहे व त्याला मार लागलेला आहे. तेव्हा, फिर्यादी व त्याचा मोठा मुलगा आशिष व आई कान्हुबाई लेनगुरे असे लगेच रूपेश लेनगुरे यांच्या घराजवळ गेले असता, येथे फिर्यादीचा मुलगा रूषभ हा जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या पायाला, व तोंडाला मार लागला होता. फिर्यादीने गावातील पोलीस पाटील यांना घटनेसंदर्भात माहिती देवुन रुषभला पोलीस स्टेशनला नेले. या वेळी घाटंजी पोलिसांनी रुषभला घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेतील दोन आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 1042/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103, 3 (5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत हे करित आहे.