मुंबई: नोंदी असूनही प्रमाणपत्रे का (Manoj Jarange Patil) दिली जात नाहीत, हे आम्ही (Maratha Reservation) बारकाईने पाहत आहोत. तसे झाले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याने आंदोलनाची वेळ येणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 200 वर्षांपूर्वीच्या नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे दिली जात नसतील तर मुख्यमंत्री आणि सरकारबद्दल चीड निर्माण होणे साहजिक असल्याचे ते म्हणाले.

सरकार आणि काही अधिकारी नोंदी उपलब्ध असूनही जाणूनबुजून अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्री एकही प्रमाणपत्र रोखले जाणार नाही, असे सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिंदे समिती सुरू करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगून आता आम्ही वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले. पनवेलमध्ये मराठा बांधवांनी उभारलेले मराठा भवन हा चांगला उपक्रम असून असे उपक्रम संपूर्ण राज्यात व्हायला हवेत, असे मतही त्यांनी मांडले.
यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अधिवेशनात सत्ताधारी आपापसातच दोन दिवस भांडतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल, त्यांना काहीही मिळणार नाही, असा आरोप त्यांनी केला. सर्व जातींच्या आरक्षणाचे विषय प्रलंबित असून सरकारने लोकांची नस ओळखली आहे, असे ते म्हणाले. हैदराबाद गॅझेट निघून 3 महिने झाले तरी अजून समिती स्थापन झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास असल्याचे सांगत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर थेट आदेश काढावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आपण चांगले काम करत असल्याने माझा घातपात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. मी संरक्षण नाकारले असून माझ्यासोबत एकही पोलीस नाही, असे ते म्हणाले. घातपात प्रकरणातील आरोपी आणि माझी नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी त्यांनी केली. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांच्या मातोश्रींच्या निधनानिमित्त सांत्वनासाठी ते चाकण येथे आले असताना त्यांनी हे विधान केले.






