Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगे पाटील भडकले! ‘अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी?’ फडणवीसांना थेट सवाल; म्हणाले, ‘मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का?’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 19:18

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावात आणि परिसरात प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सुरक्षेवर बोट ठेवत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आणि “सरकारला मराठा समाजासोबत कुस्ती खेळायची आहे का?” असा खोचक सवाल उपस्थित केला.

आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत जरांगे यांनी सरकारमधील प्रमुख नेत्यांवर तसेच मराठा उपसमितीवर निशाणा साधला. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठ्यांकडून अर्ज येत नसल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगत, प्रशासनाकडूनच अर्ज स्वीकारण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत किंवा ज्यांनी अर्ज केले आहेत, अशा सर्व नागरिकांनी अंतरवाली सराटी येथे येऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कुणबी नोंदी मिळालेल्यांना तत्काळ जात प्रमाणपत्रे दिली जावीत. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीची (व्हॅलिडिटी) प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी.EWS प्रवर्गातून निवड होऊनही रखडलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे मिळावीत. संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः अंतरवालीत येऊन यावर तोडगा काढावा या मागण्या आंदोलनात ठेवण्यात आल्या आहेत

जरांगे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत मागण्यांची ठोस अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच प्रशासनाने निर्णय न घेतल्यास लाखो वाहनांसह मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा तरुणांनी नैराश्यातून कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ATSचा धडाका! गावठी पिस्टल, 2 काडतुसे अन् 2 कोयते जप्त; पुणे ग्रामीण पथकाची मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 19:53

मनोज जरांगे पाटील भडकले! ‘अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी?’ फडणवीसांना थेट सवाल; म्हणाले, ‘मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का?’

Friday, 28 August 2026, 19:18

दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा निकाल ‘राखीव’! सुनावणी पूर्ण, आता कोणता निर्णय येणार? सस्पेन्स शिगेला

Friday, 28 August 2026, 18:14

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची मलेरिया विभागाकडून तपासणी; डेंग्यू-मलेरियाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

Friday, 28 August 2026, 17:54

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

Friday, 28 August 2026, 17:43

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

Friday, 28 August 2026, 17:26
Next Post

उरुळी कांचनमध्ये ATSचा धडाका! गावठी पिस्टल, 2 काडतुसे अन् 2 कोयते जप्त; पुणे ग्रामीण पथकाची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp