अजित जगताप
वडूज : राष्ट्रीय सण असो केव्हा स्थानिक उत्सव यामध्ये वडुजकारांच्या उत्साहाला एक वेगळेच महत्व प्राप्त होत आहे. या ठिकाणी सर्व जाती व धर्माचे लोक एकत्र येऊन उत्साह साजरा करतात. काल पासून वडूज नगरीत मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणरायाच्या आरतीसाठी निमंत्रित मान्यवर उपस्थित राहत आहेत.
गेली दोन वर्षांच्या कोरोना काळात सार्वजनिक व धार्मिक उत्सवाबाबत शासकीय नियमांमूळे निर्बंध आले होते. यंदाच्या वर्षी श्री गणरायाच्या कृपेने निर्बंध शिथिल झाले आहेत. पुन्हा एकदा भक्तांचा मळा फुलला असून वडूज नगरीतील भाग्योदय मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना भाजपचे कार्यक्षम नगरसेवक ओंकार चव्हाण यांच्या शुभहस्ते पहिली महाआरती करण्यात आली.
आरतीच्या वेळी लहान मुलांचा उत्साह त्याच बरोबर युवक, महिला व जेष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. दररोज सकाळी व संध्याकाळी आरतीचे नियोजन करण्यात आले असून या कालावधीत अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवीन दीक्षित यांनी श्री गणरायाची आरती पठन केली. सर्वांच्या सहकार्याने विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून मंडळाच्या कार्यकर्त्यानी याबाबत अधिकृत सूचना करून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, खटाव तालुक्यात गेली दोन दिवस वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याच्या डबक्यात डास-मच्छर होऊ नये. यासाठी वडूज नगरीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वत्र पुन्हा एकदा औषध फवारणी करून सहकार्य करावे. अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी केली आहे.
यावेळी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा खटावचे माजी तहसीलदार विलास गडांकुश, तानाजीराव वायदंडे, मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष देवानंद थोरात, संजय जगताप, कुणाल गडांकुश, धनंजय वायदंडे, मुकुंद माने, सुरज पोतदार, शुभम रामुगडे, लखन तांबोळी, निलेश कणसे, राजेंद्र जगताप, ऋषी पडळकर, माळी, फडतरे, जगदाळे, लावंड, भोसले, पाटील, काळे, गोडसे, गायकवाड तसेच महिला सदस्या कल्पना गडांकुश, राणी देशमुखे,शितल मंगले, वनिता माने व भागोदय नगरातील सर्व गणेश भक्त या महाआरतीला उपस्थित होते.