शिक्रापूर (पुणे) : विषारी औषध प्राशन केल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना कोंढापुरी (ता. शिरूर) येथे घडली. मारुती रामभाऊ काकडे (वय ४०, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विनायक नागरगोजे यांनी खबर दिल्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मारुती काकडे यांनी त्यांच्या घरी असताना अचानकपणे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.