शिक्रापूर : मोटार दुरुस्ती करणाऱ्या एका इसमाला मोटार दुरुस्तीच्या कारणाने बोलावून घेत जुन्या वादातून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करत जखमी केले. ही घटना शिक्रापूर (ता. शिरुर) येथे घडली. याबाबत अजितकुमार फुलचांद जैसवार (वय ३३ रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. भितरी केराकत ता. जैनपूर जि. जैनपूर उत्तरप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चार इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. मोटार दुरुस्ती करणारे अजितकुमार जैसवार घरी असताना त्यांना अज्ञात इसमाने फोन करुन मोटार दुरुस्ती करायची असल्याचे सांगत दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी शिवीगाळ करत तू मनोज काटे सोबत भांडणे का केले होते, असे म्हणून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करत जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे हे करत आहेत.