पुणे : पैसे मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी कल्पेश फकीरचंद रंगारी (वय ४२, रा. फॉरेस्ट पार्क सोसायटी) याला अटक केली आहे. तर, रोहित प्रकाश पारख (वय २९, रा. वडगावशेरी), अक्षय पाटोळे हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत रोहित पारख याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी रंगारी याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १७ डिसेंबर रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क सोसायटीच्या परिसरात घडली आहे. फिर्यादी पारख हा मित्र पाटोळे याला घेऊन त्याच्या कामाचे पैसे मागण्यासाठी रंगारी याच्याकडे गेला होता. पारख याने पैसे मागितल्याचा रंगारी याला राग आला. त्या कारणातून त्याने घरातील कोयता आणून पारख आणि रंगारी या दोघांवर वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.