राजेंद्रकुमार शेळके
पुणे : ‘असोसिएशन फॉर क्वालिटी एज्युकेशन अँड रिसर्च’ हैदराबाद संस्थेच्या वतीने वैयक्तिक कामगिरीच्या विविध पैलूंचा समावेश असलेल्या व गुणवत्तेवर आधारित निकषांवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू यांना वार्षिक पुरस्कार जाहीर केले जातात. यावर्षी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला राम चौधरी यांना यातील तीन प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
डॉ. शर्मिला चौधरी यांना जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये २०२०-२०२१ साठी ‘बेस्ट आउटरीच कार्यक्रम संयोजक पुरस्कार’, २०२१-२०२२ साठी ‘उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार’, २०२२-२०२३ साठी ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’चा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी अभिनंदन केले.
मामामाहेब मोहोळ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वृंद आदींनी प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.