जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे कर्करोग. हे मृत्यूचे प्रमुख कारण म्हणूनही ओळखले जाते. आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सर होऊ शकतो, एवढेच नव्हे, तर तरुण-तरुणीही त्याला बळी पडत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच आरोग्यतज्ञ सर्व लोकांना लहान वयापासून कर्करोगाच्या जोखमीपासून दूर राहण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचा सल्ला देतात.
कोलन कॅन्सर किंवा मोठ्या आतड्याच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. याला कोलोरेक्टल कॅन्सर असेही म्हणतात. या कर्करोगामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. कर्करोगाचे वेळीच निदान न झाल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोलन कॅन्सरची प्रकरणे तरुण प्रौढांमध्ये चिंताजनक दराने वाढत आहेत. हा कर्करोग टाळता येऊ शकतो.
आहारातील काही बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः जास्त फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. चांगल्या खाण्याच्या सवयीमुळे कोलन कॅन्सर आणि पोटाच्या इतर कॅन्सरचा धोका कमी होतो. प्रक्रिया केलेले मांस, प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट पदार्थ, साखरयुक्त पेये आणि अल्कोहोलमुळे तुमच्या कोलन कर्करोगाचा धोका 14 टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.