मुंबई : शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड होताना दिसत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. ग्रीन झोनमध्ये उघडल्यानंतर, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 400 हून अधिक अंकांची झेप घेतली आणि पुन्हा एकदा 78000 चा टप्पा पार केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीतून सावरला.
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ दिसून आली. मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच, बीएसई सेन्सेक्सने मागील बंद झालेल्या 77,964 या पातळीवरून झेप घेतली आणि 78,019 च्या पातळीवर उघडला आणि अवघ्या 15 मिनिटांच्या व्यवहारात 450 अंकांची भक्कम वाढ करून तो 450 अंकांच्या पातळीवर पोहोचला. इतकेच नाही तर NSE निफ्टी 23,616.05 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत 23,679.90 च्या पातळीवर उघडला आणि थोड्याच वेळात तो 152.85 अंकांनी झेप घेऊन 23,768.90 च्या पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले.
दरम्यान, सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स उतरल्याचे दिसून आले. भारतात चीनच्या एचएमपीव्ही विषाणूची प्रकरणे आढळून आल्याने, बाजारात मोठी घडामोड दिसून आली.