मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना महावितरणने ‘शॉक’ दिला आहे. एन सणासुदीच्या मुहूर्तावर लवकरच वीज दरवाढीची शक्यता आहे. वीज ग्राहकांना लवकरच ६० ते ७० पैसे प्रति युनिट म्हणजेच १५० ते २०० रुपयांनी अधिक बिल येण्याची शक्यता आहे. यामुळे गृहणींचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
दिवसेंदिवस इंधन, गॅस सिलेंडर, दूधाच्या दरात वाढ होत चालली आहे. राज्य सरकारी महनिर्मिती कंपनीला केवळ राज्य सरकारच्याच महावितरण कंपनीलाच वीज विक्रीची परवानगी आहे. कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीचा खर्च वाढलाय. त्याचा भार इंधन समायोजन शुल्काद्वारे अखेर ग्राहकांवरच येणार आहे. आणि हि दरवाढ नोव्हेंबरनंतर लागू होण्याची शक्यता आहे.